झार
झार : रशियातील मस्कोव्हीच्या (मॉस्को) राजपुत्रांनी धारण केलेले एक बिरुद. ही संज्ञा रोमन सम्राटांच्या सीझर या अभिधानाचा अपभ्रंश आहे. राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही त्यामुळे अशीच नावे प्राप्त झाली उदा., झारची पत्नी–झारित्सा; युवराज–झारेविश; राजकन्या–झारेव्हना इत्यादी.